पुणे

दौंड तालुक्यातील पत्रकारावर स्थानिक गुंडाकडून कोयत्याने जीवघेणा हल्ला

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

पुणे -(दौड )दोन वर्षांपूर्वी केलेल्या बातमीचा राग मनात ठेवून दौड तालुक्यातील एका पत्रकारावर स्थानिक गुंडानी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक बाबमाहिती समोर आली आहे. हल्ला केल्याची घटना पाटस (ता. दौंड) येथे पडली.

 

विनोद गायकवाड असे या पत्रकाराचे नाव असून ते लोकशाही या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी असल्याची माहिती समोर येत आहे. दौंडमधील पाटस येथे एका लग्न सोहळ्यात जून्या बातमीचा राग मनात ठेवत स्थानिक तीन गुंडांनी गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद गायकवाड हे त्यांच्या भावकीतील लग्नसमारंभ आटोपून लग्न मंडपातून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये वार करण्यात आला. तसेच त्यांच्या छाती व दंडावरही जबर मारहाणीच्या खुना दिसत आहेत. गंभीर जखमी झाल्याने पत्रकार विनोद गायकवाड यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.