पुणे

दिव्यांगाच्या सेवेसाठी महाराष्ट्र आरोग्य मंडळ व रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे कृत्रिम पाय बसविणे शिबीर

अपघात किंवा काही वैद्यकीय कारणांनी पाय गमावलेल्या ५१ दिव्यांगाना ५५ कृत्रिम पाय ( जयपूर फूट) मोफत बसवून देण्याचे शिबीर दि.०७.०५.२०२३ रोजी महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या साने गुरुजी आरोग्य केंद्र, हडपसर, पुणे व रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी ५१ दिव्यांगाच्या पायाचे माप घेण्यात आली होती. या शिबीराला श्री. सुधीरकुमार बुक्के, सह धर्मदाय आयुक्त, पुणे यांनी भेट दिली. त्यांनी दिव्यांगाची भेट घेवून त्यांची विचारपूस केली तसेच त्यांचे मनोबल वाढविले.

 

पाय गमावलेल्या व्यक्ती केवळ त्यांचा रोजगार गमावत नाहीत तर स्वाभिमानाने जीवन जगण्याची उमेद गमावतात. वजनाने हलके व उत्तम दर्जाचे कृत्रीम पाय विनामूल्य मिळालेले दिव्यांग बांधव सर्वार्थाने आपल्या पायावर उभे राहू शकतील. या शिबीरासाठी महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे सचिव, श्री. अनिल गुजर, उपाध्यक्ष, श्री. सतीश आगरवाल, संस्थेचे सभासद, श्री. सिध्दार्थ गुजर, रोटरी क्लब न्यू कल्याणचे प्रेसिंडेट डॉ. शुश्रुत वैद्य, रोटरी दिव्यांग सेंटर प्रमुख, रोटेरियन श्री. नामदेव चौधरी, पुणे कॅम्प प्रकल्प प्रमुख रोटेरियन श्री. बिन्देश सिंह, रोटेरियन श्री. सुधीश नायर, एन्न ज्योति विदेश सिंह, श्री. भगवान चौधरी, श्री. सागर मिटकरी, श्री. माधव पडवळ, डॉ. चंद्रशेखर महाजन, श्री. अमोल झगडे इ. उपस्थित होते.

 

या शिबीरामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व धाराशिव या जिल्हयातील दिव्यांगानी सहभाग घेतला. या शिबीरामध्ये पाच वर्षाच्या बालकापासून ते ७५ वर्षाचे वृध्द सहभागी झाले. शिबीरामध्ये ४५ पुरुष व ६ महिला दिव्यांगाना कृत्रिम पाय (जयपूर फुट) बसविण्यात आल्याची माहिती संस्थेचे चिटणीस अनिल गुजर यांनी दिली.

 

अनिल सि. गुजर, चिटणीस ,
महाराष्ट्र आरोग्य मंडळ. मो. क्र. ९८५०७३०३४१