पुणे

ईडी म्हणजे भाजपची घरगडी – शहराध्यक्ष प्रशांत जगताप – ‘जयंत पाटील यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँगेसकडून निदर्शने”

केंद्र सरकारच्या यंत्रणांचा वापर करून सूडबुद्धीने विरोधकांवर कारवाई करण्याचे सत्र सध्या देशभरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांना समन्स जारी केल्यानंतर आज स्वतः जयंत पाटील साहेब ईडीच्या कार्यालयात गेले आहेत. यावेळी जयंत पाटील साहेबांच्या समर्थनार्थ पुणे शहरातील समस्त पदाधिकाऱ्यांनी बालगंधर्व रंगमंदिर चौकात निदर्शने केली व स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी इडी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा निषेध केला.

“सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है” , “ईडी म्हणजे भाजपचा घरगडी”, “वातावरण फिरलय , सरकार घाबरलय” , “नागपूरचा पोपट काय बोलतोय,फौजदाराचा हवलदार झालो म्हणतोय” अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

 

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”गेल्या तीन दशकांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आ. श्री. जयंत पाटील साहेब यांच्यावर देखील इडीची कारवाई करत त्यांचा आवाज दाबण्याचा तसेच त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी करू पाहत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अश्या दबावाला बळी पडणार नाही,तुम्ही जितका त्रास द्याल तितक्या जास्त ताकदीने आम्ही येत्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला. तसेच पुणे जिल्याचे जिल्हाधिकारी मा.श्री. राजेंद्र देशमुख याना निवेदन सुधा देन्यात आले .

आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अंकुश काकडे, प्रदीप गायकवाड़ ,किशोर कांबळे, सदानंद शेट्टी, राकेश कामठे, अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते,नितीन जाधव, महेश हांडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.