पुणे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन शासकीय योजनांची माहिती व समस्या निराकरणासाठी शिबिर महत्त्वाचे…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

शासकीय विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये अंजनी लॉन्स मंगल कार्यालय एनडीए रोड कोंढवे धावडे, पुणे या ठिकाणी मंगळवार दिनांक 30 मे रोजी सकाळी दहा वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्री शक्ती समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल हवेली, विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय हवेली, उरुळी कांचन आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबीर संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे अध्यक्ष तहसीलदार किरण सुरवसे यांनी केले आहे.

शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून स्री शक्ती समाधान उपक्रम राबविण्यात येत आहे. या शिबिरात तालुकास्तरावरील सर्व कार्यालय तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद ,पोलीस विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, बांधकाम, पाणीपुरवठा ,महावितरण, बचत गट ,शिक्षण विभाग ,तालुका विधी सेवा प्राधिकरण ,समाज कल्याण, पशुसंवर्धन यांचा सहभाग असणार आहे.

 

जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समिती अध्यक्ष तथा तहसीलदार  किरण सुरवसे व सचिव तथा बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती.निलम भूमकर यांनी केले आहे.