Uncategorizedपुणे

“पायाला दुखापत होऊनही कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा केली पुर्ण, आर्यनमॅन नंतर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा पुर्ण करणारे डॉ. शंतनू जगदाळे पहिले राजकीय पदाधिकारी

जगातील सर्वात लांब व आव्हानात्मक असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुण्यातील डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी सहभागी होऊन अवघ्या11तास 35मिनिटा ही मानाची स्पर्धा पूर्ण केली.पायाला दुखापत झाली असताना आर्यनमॅन नंतर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन ती यशस्वीपणे पूर्ण करणारे डॉ.शंतनू जगदाळे हे पहिले राजकीय पदाधिकारी ठरले आहेत.

 जगातील सर्वात जुनी व सर्वात मोठी ही अल्ट्रा मॅरेथॉन शर्यत आहे ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेच्या जवानांच्या स्मरणार्थ भरवली होती यावर्षी या स्पर्धेत सुमारे 20,000 स्पर्धकांनी भाग नोंदवला होता त्यामध्ये भारतातील 403स्पर्धक होते यामध्ये हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  डॉ. शंतनू जगदाळे यांचा समावेश होता.

 दर्बन ते पीटर्स मेरिटजबर्ग या दोन शहरा दरम्यान ही स्पर्धा होती त्याचा मार्ग 870 मीटर चढ असलेला आहे ही शर्यत 12 तासांच्या आत पूर्ण करायची असते या स्पर्धेदरम्यान सहा कट ऑफ दिलेले आहेत कट ऑफ टाइमिंग नंतर एखाद्या ठराविक ठिकाणी पोहोचल्यास पुढे जाण्याची परवानगी नसते,  मात्र वेळेतच डॉ. शंतनू जगदाळे यांनी स्पर्धा पूर्ण केली.

 नुकतेच जगातील मानाची आर्यन मॅन स्पर्धा ही कझाकस्तान येथे पार पडली यात भारतातून डॉ.शंतनू जगदाळे सहभागी झाले होते त्यांनी ही स्पर्धा यशस्वी वेळेत पूर्ण केली त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या नुकत्याच कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा डॉक्टर जगदाळे यांनी पूर्ण केली. रनोहोलिकसचे संस्थापक डॉ.योगेश सातव यांच्या नेतृत्वाखाली प्रॅक्टिस करत होते.

राजकारणातील स्पर्धा पूर्ण करणारे भारतातील ते एकमेव ठरले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षनेते अजित पवार  खासदार सुप्रिया सुळे खासदार वंदना चव्हाण खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार चेतन तुपे ,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली ताई चाकणकर,शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी अभिनंदन केले आहे.जगातील सर्वात लांब व आव्हानात्मक असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत पुण्यातील डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी सहभागी होऊन अवघ्या11तास 35मिनिटा ही मानाची स्पर्धा पूर्ण केली.पायाला दुखापत झाली असताना
आर्यनमॅन नंतर कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन ती यशस्वीपणे पूर्ण करणारे डॉ.शंतनू जगदाळे हे पहिले राजकीय पदाधिकारी ठरले आहेत.
जगातील सर्वात जुनी व सर्वात मोठी ही अल्ट्रा मॅरेथॉन शर्यत आहे ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेच्या जवानांच्या स्मरणार्थ भरवली होती यावर्षी या स्पर्धेत सुमारे 20,000 स्पर्धकांनी भाग नोंदवला होता त्यामध्ये भारतातील 403स्पर्धक होते यामध्ये हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे यांचा समावेश होता.

दर्बन ते पीटर्स मेरिटजबर्ग या दोन शहरा दरम्यान ही स्पर्धा होती त्याचा मार्ग 870 मीटर चढ असलेला आहे ही शर्यत 12 तासांच्या आत पूर्ण करायची असते या स्पर्धेदरम्यान सहा कट ऑफ दिलेले आहेत कट ऑफ टाइमिंग नंतर एखाद्या ठराविक ठिकाणी पोहोचल्यास पुढे जाण्याची परवानगी नसते, मात्र वेळेतच डॉ. शंतनू जगदाळे यांनी स्पर्धा पूर्ण केली.
नुकतेच जगातील मानाची आर्यन मॅन स्पर्धा ही कझाकस्तान येथे पार पडली यात भारतातून डॉ.शंतनू जगदाळे सहभागी झाले होते त्यांनी ही स्पर्धा यशस्वी वेळेत पूर्ण केली त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या नुकत्याच कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा डॉक्टर जगदाळे यांनी पूर्ण केली. रनोहोलिकसचे संस्थापक डॉ.योगेश सातव यांच्या नेतृत्वाखाली प्रॅक्टिस करत होते.
राजकारणातील स्पर्धा पूर्ण करणारे भारतातील ते एकमेव ठरले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षनेते अजित पवार खासदार सुप्रिया सुळे खासदार वंदना चव्हाण खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार चेतन तुपे ,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली ताई चाकणकर,शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांनी अभिनंदन केले आहे.