पुणे

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार योगेश शांताराम लोंढे, यास पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हयातुन २ वर्षा करीता तडीपार

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर व पुणे शहर परिसरामध्ये वाढत्या गुन्हेगारी वर जरब बसवण्यासाठी  पोलीस आयुक्त रितेश कुमार, सो यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घर फोडी चो-या करणारे तसेच शरिर व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत पसरविणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचे हालचालींवर नजर ठेवून त्यांचे विरुद्ध कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणेबाबतचा आदेश सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत.

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगार यांना सदर आदेशाचे अनुषंगाने चेक करून त्यांचेवर कारवाई करणे बाबतच्या सूचना आदेश श्री दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी पोलीस स्टेशनचे सहेलन्स अधिकारी पो.उपनिरी धायगुडे, पोउपनि हंबीर, पो.हवा सातपुते पोना धनवटे व भोसले यांना दिले. त्यानुसार अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे योगेश शांताराम लोंढे, (वय ३० वर्षे, रा. कुंजीरवाडी माळवाडी, ता. हवेली जि. पुणे. हा गुंड साथिदारांसह कुंजीरवाडी, म्हातोबाची आळंदी, नायगाव फाटा,) पुणे सोलापुर रोड परिसरात लोणी काळभोर पोलीस ठाणेचे कार्यक्षेत्रात वारंवार गुन्हे करीत असतो. त्याची सर्वसामान्य जनतेमध्ये घबराहट, भिती व मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, त्याचे गुंड व दहशती कृत्यामुळे व तो सतत आपले गुंड सदस्यांसह गुन्हे करीत असलेने त्यांचेविरुध्द नागरीक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. अशी माहिती मिळाली.

सदर माहितीचे आधारे  दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर त्यांनी योगेश शांताराम लोंढे, वय ३० वर्षे, रा. कुंजीरवाडी माळवाडी, ता. हवेली जि. पुणे याचे तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन मा. विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त परि. ०५, पुणे शहर यांचेकडे पाठविला होता.  पोलीस उपायुक्त परि. ५. पुणे शहर यांनी सदरचे प्रस्तावाची पडताळणी करुन दिनांक १६/०६/२०२३ रोजी त्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१)(अ) (ब) प्रमाणे पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातुन २ वर्षाकरिता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.

सदरची कारवाई  रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर,  संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,  रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर,  विक्रांत देशमुख, पोलीस उपआयुक्त परि. ०५, पुणे शहर, अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक  दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक, (गुन्हे)  सुभाष काळे, पोउपनिरी किरण पायगुडे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे, पोलीस नाईक भोसले यांनी केली आहे.