पुणेमहाराष्ट्र

तुकाई दर्शन येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

पुणे (सतिश भिसे )
श्री स्वामी समर्थ मंदिर तुकाई दर्शन, तुकाई टेकडी, फुरसुंगी,हडपसर येथे गुरूपोर्णीमा उत्सव मोठ्या भक्तीभावात,उत्साहात साजरा करण्यात आला.

 

सकाळी ७ ते ९ स्वामींना रुद्राभिषेक करण्यात आला. सांयकाळी ७.३० महाआरती श्री व सौ हेमा व विकास रासकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मंंदिराच्या विकास कामासाठी विकास रासकर यांनी एक्कावन्न हजार रु.चा धनादेश श्री स्वामी समर्थ मंदिर व्यवस्थापन समितीचे शादाब मुलाणी यांच्या कडे सुपुर्द केला.सायंकाळी ७.४५ नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.दिवसभरात हजारो स्वामीभक्तांची दर्शनासाठी रीघ लागली होती.

 

कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ होले यांनी केले,तर कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रविण होले,अविनाश गोडसे,भुषण चव्हाण,शैलेश काळभोर,पांडुरंग शेंडे यासह अनेक स्वामी भक्तांनी प्रयत्न केले.