पिंपरी-चिंचवडपुणे

पिंपरी चिंचवडचा हाच का तो विकास आणि हीच का ती स्मार्ट सिटी – आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांचा सवाल

पिंपरी चिंचवड शहरात शेकडो कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीचे स्वप्न आम्हाला पिंपरी चिंचवडकरांना दाखवण्यात आले परंतु सध्या शहराची खासकरून पिंपळे निलख, विशालनगर, रक्षक चौक,कस्पटे वस्ती या परिसरात जागोजागी पाणी साचलेले दिसते.स्मार्ट सिटीचे कामाच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवण्यात आली आहे.त्याच जागी अनेक मोठमोठे खड्डे पडलेले दिसतात.

या संबंधीत प्रकार वेळोवेळी ड प्रभागातील जनसंवाद माध्यमातून मांडण्यात आला परंतु प्रशासक असल्याने या अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही.त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचण्यास कारणीभूत असणाऱ्या ठेकेदारांना नेमके शहरातील रस्त्यांवर पाणी साचवण्याचे काम दिले होते की रस्ते स्मार्ट करण्याचे काम दिले होते याची चौकशी मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी करावी .आज आम्ही आम आदमी पार्टी म्हणून शहरात साचलेल्या पाण्यामध्ये होड्या सोडून निषेध व्यक्त केला आहे आणि येत्या दोन दिवसांत शहरातील खड्डे बुचवण्यात आले नाही तर खेड्यांमध्ये झाडे लावू अन्यथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावाने या खड्ड्यांचे नामकरण करू असा इशारा आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी दिला.