पुणे

हडपसर मगरपट्टा चौकातील महादेव मंदिरासमोर पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे 

पुणे : हडपसर मधील मगरपट्टा चौकामध्ये लोहिया गार्डन जवळ पुणे महानगरपालिका कार्पोरेशनची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सध्या जरी पावसाळ्याचे दिवस असले तरी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाऊस नसल्यामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे त्यामुळे पुणेकर पाण्याचा जपूनच वापर करत आहेत परंतु अशा रीतीने पाईपलाईन फुटून पाणी वायफट जाणे म्हणजे एखाद्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.महादेव मंदिर समोरील पाईपलाईन ही पुन्हा एकदा फुटल्यामुळे  लाखो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर तेथील पाईपलाईन दुरुस्तीचे काम करावे अशी मागणी शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख उल्हास भाऊ तुपे यांनी केली आहे.