पुणे

Breking news : पुण्यातील हिंजवडीमधील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे :सध्या पुण्यामधील मुंढवा पोलीस स्टेशन हद्द,कोंढवा,कोरेगाव पार्क, डेक्कन परिसर आणि शहरातील मध्य भाग, कल्याणी नगर, विमाननगर,येथे आणि हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर बेकायदेशीर पणे चालू आहेत. त्यामुळे तरुण पिढी मोठया प्रमाणात त्याच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होऊन बरबाद होत आहे.सोमवारी हिंजवडी येथील विनोदे कॉर्नर येथे एका हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. ही कारवाई सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

त्यामध्ये हुक्का पार्लर चालक झाकीर सलायत मल्लीके (वय 33, रा. भूमकर नगर, वाकड), हार्दिक विजय वाघुले (वय 30, रा. लोणी काळभोर), रविकिरण शेजराव केदार (वय 27, रा. भूमकर नगर, वाकड)यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे अंमलदार अरुण नरळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हॉटेल बी 5 रूफटॉप लॉज येथे ग्राहकांना अवैधरित्या ओढण्यासाठी हुक्का उपलब्ध करून दिला होता. यांची बातमी पोलिसांना समजताच सदरील हॉटेलवर पोलिसांनी धाड मारली असता तेथे बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरु असल्याचे हिंजवडी पोलिसांना दिसून आले. तेथे पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. आणि त्यामध्ये पोलिसांना त्याठिकाणी 15 हजार 900 रुपयांचा तंबाखूजन्य हुक्का आणि साहित्य मिळून आले. ते पोलिसांनी जप्त केले आहे.पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.