पुणेमहाराष्ट्र

जेएसपीएम चौकात बुलेट रायडर्सवर कारवाई हांडेवाडी वाहतूक ः 12 बुलेटस्वारांकडून 12 हजार रुपयांचा दंड वसूल

फुरसुंगी, दि.  ः फटाक्याचा आवाज करीत बुलेट दामटणार्‍यांवर हांंडेवाडी वाहतूक विभागाने कारवाई करून 12 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हांडेवाडी रस्ता येथील जेएसपीएम चौकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक बालाजी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल लेकावळे, अप्पाराव कोळी, शशिकांत साळुंखे, विकास टेमगिरे, विजय औटी, भरत जाधव, महिला पोलीस हवालदार प्रतिभा पाटील, पोलीस मित्र समीर पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

साळुंखे म्हणाले की, बुलेट रायडर्स फटाक्याचा आवाज काढत असल्याने इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होत आहेत. वारंवार समज देऊनही बुलेट रायडर्सकडून सुधारणा होत नाही. त्यामुळे आज (गुरुवार, दि. 1 फेब्रूुवारी) ही कारवाई करण्यात आली असून, यापुढेही कारवाई कडक करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.