पुणेमहाराष्ट्र

बाह्यरंगाबरोबर विचारही स्वच्छ असले पाहिजेत प्राची कुलकर्णी ः ट्रिनिटी पॉलिटेक्निकमध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा

पुणे, दि. ८ ः नीटनेटकेपणा आणि वक्तशीरपणा प्रत्येकासाठी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. सुदृढ शरीराबरोबर चांगले विचार आत्मसात करा, बाह्यरंगाबरोबर विचारही स्वच्छ असले पाहिजे, असे स्पष्ट विचार ट्रिनिटी पॉलिटेक्निकच्या कॅम्पस कनेक्ट प्राची कुलकर्णी यांनी मांडले.

कोंढवा येथील ट्रिनिटी पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रा. स्मिता जगताप, प्रा. युवराज पवार, प्रा. हनुमान इंगळे, प्रा. संतोष डोईफोडे, प्रा. प्रतीक्षा सनस व सर्व शिक्षिका उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाल्या की, अलीकडे धावपळीच्या आयुष्यात करिअर कामाचा ताण, घरातील काम इत्यादी गोष्टींमुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ न मिळात नाही. स्वच्छतेअभावी गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. स्वतःची काळजी, तसेच मुलाखतीसाठी जाताना तुम्ही काय काय बदल तुमच्यामध्ये केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, जे इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष कल्याणराव जाधव आणि संकुल संचालक समीर कल्ला यांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. शरद कांदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रतीक्षा सणस यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. योगिता जाधव यांनी आभार मानले.