पुणे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विविध भागामध्ये मोठ्या उत्साहाने कार्यक्रम

केशवनगर-मुंढवा तसेच हडपसर येथील पादचारी रस्त्यावरील गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. तसेच महादेववाडी कॄष्णानगर “हॅप्पी हाऊस” येथील अनाथाश्रमातील मुलांसोबत वाढदिवसाचा केक कापून तेथील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली
शिवसेनेच्या महिला आघाडी हडपसर विधानसभा प्रमुख निशिगंधाताई नितीन थोरात यांनी केले होते.

 

“हॅप्पी हाऊस ” येथील अनाथाश्रमातील मुलांनी तसेच हडपसर येथील पादचारी रस्त्यावरील गोरगरिबांनी आणि सर्व महिला आघाडी पदाधिकार्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी देवाला प्रार्थना करत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.

 

या कार्यक्रमासाठी शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी हडपसर विभाग प्रमुख शितल गाडे, प्रिती कार्लेकर,
अर्चना सुर्यवंशी, प्रज्ञा अबनावे, आशा यादव हे उपस्थित होते.