पुणे

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणारा पती जेरबंद उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद

पुणे, दि. १० : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर भरदिवसा चाकूने सपासप वार करून खून करणाऱ्या पतीला उरुळी कांचन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पल्लवी सूर्यकांत जाधव असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, पती सूर्यकांत बळीराम जाधव (वय ३८, नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पल्लवीची आई ललिता कांबळे (रा. सोरतापवाडी, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाच्या पाठीमागे बुधवारी (दि. ७) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, आरोपी सूर्यकांत जाधव व पल्लवी यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते दोघेही नेहरूनगर, पिंपरी येथे राहण्यास होते. आरोपी हा चारित्र्याच्या संशावरून पल्लवीला वेळोवेळी शिवीगाळ करून भांडण करीत होता. मागील काही दिवसांपासून पुन्हा या दोघांमध्ये भांडण झाले. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पल्लवी या माहेरी सोरतापवाडी येथे आल्या होत्या. पल्लवी सोरतापवाडी येथे आईकडे आल्यानंतर आरोपी तिच्या पाठीमागे आला. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. यावेळी आरोपी सूर्यकांत जाधव याने पल्लवीच्या अंगावर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात पल्लवी गंभीर जखमी झाल्या. या घटनेची माहिती पल्लवीच्या नातेवाईकांनी तत्काळ उरुळी कांचन पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमीला पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे. मात्र, गुन्हा केल्यानंतर आरोपी आरोपी सूर्यकांत जाधव हा फरार होण्याच्या मार्गावर असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटोळे, पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड, रमेश भोसले, सचिन जगताप, प्रवीण चौधर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.