रोखठोक महाराष्ट्र न्युज
परभणी – वीज महावितरण कंपनीने परभणी तालुक्यातील तब्बल ७ गावांचा विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. मार्च महिना लागताच वीज महावितरण कंपनीने वसुलीसाठी ग्राहकांकडे तगादा सुरू केला असून ज्या वीज ग्राहकांनी वीज देयकाचा भरणा केलेला नाही, अशा ग्राहकांवर महावितरणने वीजपुरवठा खंडीत करण्याचे पाऊल उचचले आहे.परभणी तालुक्यातील सात गावांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आल आहे. केवळ थकबाकी न भरल्यामुळे साबा, मुरुंबा, धार, समसापूर, साटला, नांदगाव, धारणगाव, नांदगाव, जवंजाळ या सात गावांचा वीजपुरवठा चार दिवसापासून खंडीत करण्यात आला आहे. या गावांकडे वीज वितरण कंपनीची 30 ते 35 लाख रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरण कंपनीने म्हटले आहे. सध्या चालू करण्यात आलेल्या मोहिमे दरम्यान परभणी ग्रामीण विभागांतर्गत जवळपास 65 लाखांची वसुली झाली असल्याचे वीजवितरण कंपनीच्या सुत्रांनी सांगीतले आहे.गेल्या दोन महिन्यापासून वीज महावितरण कंपनीने जिल्ह्यात दिर्घकाळापासून वीज बिलाची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांना नोटीसा बजावल्या होत्या. वारंवार सुचना देऊनही वीज बील भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची धडक मोहिम राबविली जात आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही वीज वितरण कंपनी वसुलीसाठी घरोघरी जात आहे. सध्या आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्याने अनेकजण वीज बील भरण्यास असमर्थ आहेत. कोणतेही कारण ऐकून घेण्यास वीजवितरण कंपनी तयार नसून वीज ग्राहकांना वीजबिल भरणा केलेले देयक दाखवा अन्यथा कारवाईस सामोरे जा, असे धोरण अवलंबिले आहे. वीज ग्राहकांकडे वीज महावितरणच्या मासीक बिलाचा एक रुपयाही थकीत राहणार नाही, यासाठीवीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दक्षता घेत आहेत.
देवेन्द्रा अजब तुझे सरकार…. थकबाकी न भरल्यामुळे सात गावांचा वीजपुरवठा खंडीत

Related tags :
14 Comments
Oldest