आज आपण उघड करणार आहोत हडपसर, मगरापट्टा खराडी परिसरात सुरू असलेल्या धक्कादायक गुंतवणूक फसवणुकीचा प्रकार.
सरकारी नियम धाब्यावर बसवून काही कंपन्या जास्त व्याजाचे आमिष दाखवत गोरगरीब गुंतवणूकदारांची लूट करत असल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत.
या कंपन्या लोकांना सांगतात –
“जमीन घ्या… आणि आम्हालाच भाड्याने द्या… आम्ही तुम्हाला दरमहा 5 टक्के परतावा देऊ.”
म्हणजेच वर्षाला तब्बल 60 टक्के परतावा!
पण तज्ज्ञ सांगतात –
शेती व्यवसायातून किंवा जमिनीच्या भाड्यातून इतका परतावा मिळणे जवळजवळ अशक्य आहे.
अशा प्रकारच्या योजना अनेकदा पॉन्जी स्कीम किंवा कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम म्हणून ओळखल्या जातात.
अशा योजना चालवण्यासाठी SEBI ची परवानगी आवश्यक असते.
परंतु अनेक कंपन्या एजंटांच्या माध्यमातून कमिशन देऊन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक गोळा करत असल्याची माहिती समोर येत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे –
काही ठिकाणी लिटिगेशन असलेल्या जमिनी गुंतवणूकदारांच्या नावावर करून त्याच जमिनी भाड्याने घेतल्याचे दाखवून व्याज दिले जाते.
सुरुवातीला काही महिने पैसे दिले जातात…
आणि नंतर कंपनी बंद पडते…
गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकतात.
प्रश्न असा आहे –
या महाठकांवर कारवाई कधी होणार?
एकेकाळी “शिव-राज्यात” अशा फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई होत होती…
पण आता ग्लोबल स्वप्न दाखवून लोकांची लूट सुरू आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
रोखठोक महाराष्ट्र न्यूज या प्रकरणाचा सखोल तपास करत असून
अशा कंपन्यांचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला आहे.
जर तुमची किंवा तुमच्या ओळखीतील कोणाची अशा गुंतवणूक योजनेत फसवणूक झाली असेल
तर आमच्याशी संपर्क साधा.
आम्ही तुमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
सावध रहा… सुरक्षित गुंतवणूक करा… आणि अशा फसवणूक करणाऱ्या योजनांपासून दूर राहा.
