धक्कादायक बातमी पुण्यातून… हडपसरच्या ससाणेनगरमध्ये कर्णकर्कश साऊंडमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे… बेजबाबदार मिरवणुकीमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप आता होत आहे…मिळालेल्या माहितीनुसार, ससाणेनगरच्या लेन नंबर १२ मध्ये राहणाऱ्या जाधव आडनावाच्या महिला मिरवणूक पाहण्यासाठी बाहेर आल्या होत्या…
मात्र मिरवणुकीत लावण्यात आलेला साऊंड इतका कर्णकर्कश होता की आसपासच्या नागरिकांनाही त्रास जाणवत होता…अचानक त्या महिलांना चक्कर आली… आणि काही क्षणांतच त्या खाली कोसळल्या…
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं… पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं…
शासकीय नियमांनुसार ९० डेसिबलपेक्षा जास्त आवाजास स्पष्ट मनाई आहे…
तरीही एवढा प्रचंड साऊंड कसा लावण्यात आला…?
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत…
पोलिस आणि संबंधित विभागांनी वेळेत कारवाई केली असती… तर कदाचित हा जीव वाचला असता…
मृत महिलेचे मुलगा सौरभ जाधव यांनी सांगितले की…
“हा अपघात नाही… ही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेली घटना आहे…”
आता काही मोठे प्रश्न समोर उभे राहत आहेत…
👉 ९० डेसिबल मर्यादा असताना परवानगी कोणी दिली?
👉 पोलिस नियंत्रण कुठे होते?
👉 आयोजकांवर गुन्हा दाखल होणार का?
ससाणेनगरमध्ये संतापाची लाट उसळली असून…
नागरिकांनी संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे…
अशा बेजबाबदार मिरवणुकींवर आता कठोर कारवाई होणार का…?
हा मोठा प्रश्न आहे…
