पुण्यातील महंमदवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोल्हापूर येथे वास्तव्यास असलेल्या जेष्ठ महिला वैशाली सरदेसाई यांच्या मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सर्वे नंबर ५९/९ग/१ब/२ ही जमीन त्यांच्या पती स्वर्गीय भाऊसाहेब सरदेसाई यांनी १९८५ साली नोंदणीकृत खरेदीखताद्वारे विकत घेतली होती. त्यानंतर या जमिनीवर कुटुंबाचा कायदेशीर ताबा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, विजय देसाई, महादेव देसाई आणि अजय देसाई यांनी ही जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन तिथे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी भाडेकरू ठेवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, तक्रारदार महिला पुण्यात राहत नसल्याचा गैरफायदा घेत हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
या प्रकरणी पुणे महानगरपालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित विभागाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रारदारांनी पोलिसांकडेही गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच आपला मालकी हक्क परत मिळवून देण्याचीही विनंती केली आहे.
आता या प्रकरणात प्रशासन आणि पोलीस कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात विजय देसाई यांच्याशी संपर्क साधला असता लीगल मार्गाने जावे व जमीन आम्ही कोणावर अन्याय करत नाही. त्यांनी त्यांची जागा रीतसर क्लिअर करावी. असे विजय देसाई यांनी सांगितले.
