Uncategorized

“शरद पवारांची” माढातून माघार; हा मोदींच्या लोकप्रियतेचा विजय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

राष्ट्रवादी अध्यक्ष  शरद पवार यांनी आज माढ्यातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माढ्यातून माघार घेणे हा युतीचा मोठा विजय आहे, असा जोरदार टोला लगावला आहे.

देशात आणि महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींना पाठिंबा वाढतो आहे. मोदीजींनी एकदा म्हटले होते की,बदललेल्या हवेचा अंदाज शरद पवार यांना लवकर येतो. त्याचमुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे,असेही फडणवीस म्हणाले.देशाचा मूड काय आहे,याचा अंदाज शरद पवार यांना आला आहे.

पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केले. आपण लोकसभा लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुटुंबातील तिघांनी लोकसभा निवडणूक लढावी,असे वाटत नाही. त्यामुळे मी माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे पवारांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र त्यांनी हा निर्णय जाहीर करताच फडणवीस यांनी युतीचा हा पहिला मोठा विजय झाला आहे,असे म्हटले आहे.पवार यांनी आता कोणतीही लाट वगैरे दिसत नाही,असे म्हटले असले तरीही मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींचा वाढता पाठिंबा पवारांना लक्षात आला आहे त्यामुळेच त्यांनी माघार घेतली आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवरून पडद्याआड कोणत्या प्रकारच्या हालचाली झाल्या,याचा अंदाज येत आहे.

 

0 0 votes
Article Rating
18 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments