पुणे

एकेकाळी हिंदुस्थान हादरवणारे पेशवे… आज त्यांच्या वंशजांचं वास्तव काय?

ज्यांच्या नावाचा डंका एकेकाळी अटकेपार पोहोचला… ज्यांनी पुण्याच्या शनिवारवाड्यावरून संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रं हलवली… त्या श्रीमंत पेशव्यांचे वंशज आज कुठे आहेत? ते काय करतात? भव्य राजवाडे सोडून आज ते कशा पद्धतीचं आयुष्य जगत आहेत? आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण याच इतिहासाच्या जिवंत वारसांचा शोध घेणार आहोत. पेशवे: कालचा दरारा आणि आजचं वास्तव!“पुण्यातील शनिवारवाडा… मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारी ही वास्तू. १७१३ ते १८१८ या काळात ज्या घराण्याने भारताच्या नकाशावर भगवा झेंडा फडकवला, त्या पेशव्यांचा वारसा आजही पुण्यात जिवंत आहे. १८१८ मध्ये पेशवाई संपल्यानंतर इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना कानपूरजवळील बिठूरमध्ये धाडलं. पेशवे घराणं विखुरलं गेलं, पण रक्तातील तोच स्वाभिमान घेऊन या घराण्याच्या पुढच्या पिढ्या पुन्हा पुण्यात परतल्या.”

 

“आज पेशव्यांची १० वी आणि ११ वी पिढी आपल्या पुण्यात वास्तव्यास आहे. पण हे वंशज कोणत्याही राजेशाही थाटात नाही, तर अत्यंत साधेपणाने आणि कष्टाने आपलं आयुष्य घडवत आहेत.
डॉ. विनायकराव पेशवा: पेशव्यांचे ज्येष्ठ वंशज. पुण्याच्या विद्यापीठात त्यांनी भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष सेवा दिली.
स्व. महेंद्र पेशवा: पेशव्यांच्या वारसाचे महत्त्वाचे नाव. पुण्यात त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता. दुर्दैवाने, गेल्या काही वर्षात आपण त्यांना गमावलं आहे.

 

उदयसिंह पेशवा: भारतीय लष्कराचे निवृत्त अधिकारी. घराण्यातील ही पिढी आजही पराक्रमाची परंपरा जपून आहे.”“आज हे वंशज कॉर्पोरेट क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात आणि व्यवसायात सक्रिय आहेत. शनिवारवाड्याची मालकी आज सरकारकडे असली, तरी पुण्याचा सांस्कृतिक मान आजही याच घराण्याकडे आहे. मग तो कसबा गणपतीची आरती असो किंवा ऐतिहासिक सोहळे, पेशव्यांच्या वंशजांशिवाय हे कार्यक्रम अपूर्ण मानले जातात. इतिहासाशी छेडछाड झाली की हेच वंशज आजही ढाल बनून समोर येतात.”

 

 

“काळ बदलला, सत्ता बदलली, पण पेशव्यांच्या रक्तातला तोच बाणा आणि साधेपणा आजही या पिढ्यांमध्ये दिसून येतो. एकेकाळी तलवारीने राज्य करणारे हे हात आज लेखणी आणि ज्ञानाने समाजाची सेवा करत आहेत. ही होती शनिवारवाड्याच्या खऱ्या वारसांची गोष्ट.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा