“पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर… शांत आणि साधं गाव.
पण या गावात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
चार वर्षांची एक चिमुरडी… सुट्टीसाठी आजीकडे आली होती.
राम मंदिर परिसरात ती खेळत होती.
पण काही वेळातच ती गायब झाली… आणि त्यानंतर जे समोर आलं, ते अंगावर काटा आणणारं होतं.
६५ वर्षांच्या एका नराधमाने त्या चिमुकलीला आमिष दाखवत जवळच्या गोठ्यात नेलं.
तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला… आणि पुरावे मिटवण्यासाठी तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
इतकंच नाही… मृतदेह शेणाखाली लपवण्याचाही प्रयत्न झाला.
मुलगी बराच वेळ दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज तपासलं… आणि त्यात ती आरोपीसोबत जाताना दिसली.
ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवली… आणि एका गोठ्यात चिमुरडीचा मृतदेह सापडला.
क्षणात संपूर्ण गाव पेटलं.
पण या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे…
हा आरोपी पहिल्यांदाच गुन्हा करत नव्हता!
गावकऱ्यांच्या माहितीनुसार, या आरोपीवर यापूर्वी स्वतःच्या पुतणीवर अत्याचार केल्याचा आरोप होता.
एका ७५ वर्षांच्या महिलेलाही त्याने लक्ष्य केलं होतं.
तो दोन वेळा जेलमध्ये जाऊन आला… पाच-सहा वर्षांपूर्वी बाहेर पडला… पण त्याची मानसिकता बदलली नाही.
आता प्रश्न फक्त एका आरोपीचा नाही…
प्रश्न आहे, अशा गुन्हेगारांवर वेळेत कठोर कारवाई का होत नाही?
प्रश्न आहे, लहान मुली आणि महिलांची सुरक्षितता नेमकी कोणाच्या हातात आहे?
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.
नसरापूरमध्ये तणावाचं वातावरण आहे… आणि संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय.
एका चिमुकलीचं आयुष्य संपलं…
पण आता तरी व्यवस्था जागी होणार का?
हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.”
4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या | आरोपीची डर्टी हिस्ट्री हादरवणारी
