पुणे

भोंदूबाबा खरातचा काळा खेळ उघड! | अत्याचार, गर्भपात आणि कोट्यवधींचा घोटाळा

नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत…
स्वतःला अवतारी पुरुष म्हणवणाऱ्या Ashok Kharat याचा गुन्हेगारी पाय आता आणखी खोलात जात असल्याचं दिसत आहे.
महिलांवरील अत्याचार, फसवणूक, जादूटोणा… आणि आता थेट बेकायदेशीर गर्भपाताचा आरोप!
विशेष तपास पथक म्हणजेच SIT ने तपासाची व्याप्ती वाढवली असून, या प्रकरणात धक्कादायक घटनाक्रम समोर आला आहे.
२०२० पासून सुरू झालेल्या या प्रकारात…
पीडित महिलेला धार्मिक विधी आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढण्यात आलं.
त्यानंतर तिला गुंगीकारक पदार्थ देऊन वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.

 

या शोषणातून पीडिता गरोदर राहिल्यानंतर…
खरातने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
दरम्यान, पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
मात्र, गर्भपात प्रकरणात SIT ने ‘ताबा वॉरंट’ मागितल्याने तो पुन्हा कोर्टात हजर होणार आहे.
या प्रकरणात आता डॉक्टरांचाही सहभाग होता का?
गर्भपाताच्या गोळ्या नेमक्या कुठून आल्या?
याचा तपास सुरू आहे.
इतकंच नाही…
खरातवर ‘नाफेड’ आणि ‘एसीसीएफ’च्या नावाखाली शेकडो कोटींची शेतकरी फसवणूक केल्याचाही आरोप आहे.
यामुळे हा केवळ अत्याचाराचा नाही, तर मोठ्या आर्थिक घोटाळ्याचाही तपास बनला आहे.
दरम्यान, या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीची विनंती करण्यात आलेल्या अजय मिसर यांनी कामाच्या व्यापामुळे नकार दिला आहे.
आता प्रश्न एकच—
या प्रकरणात अजून किती मोठे खुलासे होणार?