24 वर्षांनंतर बापाच्या हत्येचा बदला! कात्रज बोगद्याजवळील हत्याकांडाचा थरारक उलगडा

Rokhthok Maharashtra 45 0

पुण्यातील जुन्या कात्रज बोगद्याजवळील हत्याकांडाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. तब्बल 24 वर्षांपूर्वी वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका मुलाने नियोजनबद्ध कट रचून मुख्य आरोपीची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
11 जुलै रोजी शिंदेवाडी परिसरात संजय बाबूराव कडू-देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि राजगड पोलिसांनी अवघ्या 72 तासांत चार आरोपींना अटक केली.
मुख्य आरोपी मंथन वैद्य याने चौकशीत कबुली देताना सांगितले की, 2003 मध्ये त्याच्या वडिलांची हत्या संजय देशमुख यांनी केली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी मित्रांच्या मदतीने हा कट रचण्यात आला.
पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या जलद कारवाईबद्दल पुणे ग्रामीण पोलिसांचे कौतुक होत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.