इन्स्टाग्राम Reelसाठी हातात शस्त्र; तरुणावर गुन्हा दाखल!

Rokhthok Maharashtra 7 0

इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे!
बारामती परिसरात सोशल मीडियावर लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी हातात घातक शस्त्र घेऊन Reel बनवणाऱ्या एका तरुणावर सुपा पोलिसांनी कारवाई केली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर पेट्रोलिंग पथकाच्या निदर्शनास हा व्हिडिओ आला. या व्हिडिओमध्ये हातात शस्त्र घेऊन कथितपणे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, ‘आलीशान युवा प्रतिष्ठान’ असा मजकूर आणि धमकीवजा, प्रक्षोभक वाक्यांचाही वापर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर सुपा पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित तरुणाविरोधात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून भाईगिरी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, अशा प्रकारांना कायद्याने उत्तर दिले जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.