MPSC आंदोलनाला मोठं यश! अध्यक्ष भीमनवार रजेवर, पुण्यात विद्यार्थ्यांचा जल्लोष; ६१व्या दिवशी पुन्हा इशारा
१२ दिवसांचं आंदोलन… सरकारसोबत मध्यरात्री चर्चा… आणि अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश! एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात चौकशी पूर्ण होईपर्यंत आयोगाचे अध्यक्ष भीमनवार सक्तीच्या रजेवर जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्याची विद्यार्थ्यांची मागणीही मान्य करण्यात आली आहे.
मात्र, आंदोलनाचा चेहरा विवेकानंद पाटील याने सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. चौकशी पारदर्शक व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि चौकशी ६० दिवसांत पूर्ण व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
आंदोलन स्थगित झालंय, पण लढा संपलेला नाही! ६० दिवसांत न्याय मिळाला नाही, तर ६१व्या दिवशी पुन्हा रस्त्यावर उतरणार, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.
आता प्रश्न एकच—या चौकशीतून पेपरफुटीचं सत्य बाहेर येणार का आणि दोषींवर खरंच कारवाई होणार का?





