बारामती, 14 जुलै: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘बारामती पॅटर्न’ला तडा गेली आहे. कोरोनामुक्त झालेल्या बारामती शहरात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. धक्कादायक म्हणजे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या प्रतिष्ठीत नागरिकाच कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी बारामती शहरात उद्या (बुधवार) मध्यरात्रीपासून कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पुढील आदेश मिळेपर्यत शहरात लॉकडाऊन असणार आहे.
बारामती शहरात गेल्या तीन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची सध्या 63 वर पोहोचली आहे. ज्येष्ठ नगरसेवकाचा मुलगा,
वकिलांची पत्नी आणि एका नामाकिंत बॅंकेचे अध्यक्षांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात सध्या 32 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर शहरात आतापर्यंत कोरोनामुळे 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे शहरातील काही लोक पुणे, मुंबई असा प्रवास करून आले. त्यामुळे कोरोनामुक्त शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे.
वाचा काय होता ‘बारामती पॅटर्न’
बारामती शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या परिसरातील 44 वार्डामधील 44 नगरसेवक 44 झोनल ऑफिसर व 44 पोलिस कर्मचारी नेमले होते. प्रत्येक वार्डातील दहा ते वीस स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरिकांना अत्यावश्यक घरपोच सुविधा पोहोचवण्यात येणार आहेत. त्यामुळे कुठल्याही नागरिकांना आता घराबाहेर पडता येणार नाही, याबाबत काळजी घेतण्यात आली होती.
बारामती शहरातील एका स्वयंसेवकास लॉकडाऊनच्या कालावधीत 35 ते 40 कुटुंबाची सेवा करण्याची संधी मिळली. स्वयंसेवकांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना सेवा दिली. ज्या कुटुंबीयांना अत्यावश्यक बाबीची गरज भासेल त्या नागरिकांनी त्यांना कॉल केल्यावर अत्यावश्यक सेवा करता लागणारा खर्च (त्या वस्तू खरेदीकरता येणारा खर्च) त्या कुटुंबातील व्यक्तीकडून घेण्यात आला.
नागरिकांना घरपोच अत्यावश्यक वस्तू पोहोचवण्यात आल्या. त्यात भाजीपाला, औषधी आदी देण्यात आल्या. यामुळे कोरोनाचा व्हायरस संसर्ग मुळापासून नष्ट करता येईल, यासाठी हे मिशन राबवण्यात आलं. नागरिकांना घरी बसून सर्व सेवा देण्यात आल्या. पोलिसांना शहरात गस्ती करीता तात्काळ संपर्काकरता वाकी-टॉकी देण्यात आली होती.
लॉकडाऊनच्या कालावधीत आता नागरिकांनी कोणतीही सबब न सांगता घरातच बसावे व प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केलं होतं. नागरिकांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

Nice that you are here. Feel free to ring through if blonde cam girls, if you are a wanker, submissive or a slave. I am quite multifaceted and like to ask friendly what you like to do. Let’s see if I like it.
Hi Guys! New cam models, looking to meet new and interesting people.