अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आयोजन समारंभ समितीच्या सदस्यपदी निर्माता दत्ता दळवी,कुणाल देशमुख यांची नियुक्ती
पुणे, हडपसर,. हडपसर परीसरात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारे नाटय निर्माते दत्ता दळवी यांची त्यांच्या कार्याची दखल घेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आयोजन समारंभ समितीच्या सदस्यपदी अध्यक्ष मेघराजराजे भोसले,पोलीस निरीक्षक रोहिदास किरवे यांनी नियुक्तीचे पत्र दिले, तसेच मगरपटटा येथील युवा दिग्दर्शक कुणाल देशमुख यांची देखील भरारी पथक सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली… हडपसर परीसरात गेल्या ५ वर्षापासून ते कला क्षेत्रात कार्यरत आहेत, वरात घुसली घरात, रायगडाला जेव्हा जाग येते, जस्ट गंमत या नाटकांची निर्मिती त्यांनी केली या मध्ये परिसरातील होतकरू कलावंतांना संधी दिली तसेच एका नवीन चित्रपटाची निर्मितीही ते करत आहे,,लघुचित्रपट, बेबसिरीज यांची निर्मिती करत सामाजिक कामात सक्रिय असलेले कुणाल देशमुख यांची देखील सदस्यपदी वर्णी लागली आहे, या वेळी हडपसर कलाकार महासंघाचे प्रशांत बोगम, अण्णा गुंजाळ विकास वाघमारे, श्रीकृष्ण भिंगारे, राज कडेकर, अनिल गोंदकर, अविनाश किर्ती, नगरसेवक मारुती आबा तुपे,जगदीश चव्हाण यांनी एका कार्यक्रमात त्यांना पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.



