पुणे

आधी लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले नंतर तेच फोटो नातेवाईकांमध्ये केले व्हायरल…!

पुणे:प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

नातेवाईक असणाऱ्या तरुणीने शारीरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे लग्न न करण्याची धमकी देऊन एकाने तरुणीबरोबर जीवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध बनवून त्यानंतर या संबंधांचे फोटो व व्हिडिओ नातेवाईकांमध्ये व्हायरल करून लग्नास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, याप्रकरणी विमाननगर येथे राहणाऱ्या एका 25 वर्षाच्या पीडित तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात फिर्याद दिली आहे.

 

त्यानुसार पोलिसांनी सिद्दालिंगाप्पा मल्लाप्पा मादर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा नातेवाईक आहे, आरोपीचे फिर्यादीसोबत लग्न ठरले होते, त्यामुळे तो तिच्याकडे वेळोवेळी शारीरीक संबधांची मागणी करत होता परंतु ती त्याला या गोष्टीसाठी सतत नकार देत होती, त्यावेळी त्याने तिचे जमवलेले लग्न मोडण्याची धमकी दिली, व मूळ गावी म्हणजे कर्नाटक मध्ये असताना घरात दुसरे कोणी नसताना त्याने फिर्यादीबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले व कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

काही दिवसानंतर ती तरुणी पुण्यात आल्यावर त्याने तिला पुन्हा येरवड्यातील हॉटेलमध्ये नेऊन फिर्यादीबरोबर जबरदस्तीने संबंध ठेवले,आणी फिर्यादी यांचे फोटो व व्हिडिओ मोबाईलवर बनविले, त्यानंतर त्याने लग्नास नकार देऊन फिर्यादीचे फोटो व व्हिडिओ फिर्यादीचे नातेवाईकांमध्ये व्हायरल करून तुमच्या मुलीने माझ्याबरोबर लग्नाच्या अगोदरच शारीरिक ठेवले आहेत अशी सर्वत्र बदनामी केली.