Uncategorized

भारतात प्राचीन काळापासून महिलांना अग्रस्थान : सुनील देवधर. वानवडी येथे बुद्धपौर्णिमे निमित्त महिला सन्मान समारंभ उत्साहात संपन्न..

“प्रथम देवी आणि नंतर देव अशी रचना प्राचीन काळापासून आपल्या देशात आहे, म्हणून विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या माता-भगिनींचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. भगवान गौतम बुद्धांच्या विचारणा अनुसरून डॉ आंबेडकरांनी संविधानाद्वारे महिलांना समानतेचा आणि मौलिक अधिकार प्राप्त करून दिले. केवळ भारत असा देश आहे जिथे देशाला माता संबोधले जाते. महिलांच्या सोयी-सुविधांसाठी अग्रक्रमाने विचार करणारे नेते म्हणजे पंतप्रधान नरेंदजी मोदी आहेत.”
वानवडी मध्ये महिला सन्मान समारंभ – पहिल्या कार्यक्रमात विविध व्यवसायी क्षेत्रात कार्यरत १२५ महिलांचा सत्काराचा पहिला समारंभ आणि प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत गॅस-शेगडी व सिलेंडरचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय सचिव व आंध्र प्रदेश प्रभारी सुनील देवधर बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन सुनीलजी देवधर यांच्या शुभहस्ते मेणबत्ती लावून बुद्ध पूजन आणि भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले.आमदार मा. सुनिलभाऊ कांबळे, शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार अलीजी दारूवाला, भारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष सुरेशजी हेमनानी, ऍड मुरलीधर कचरे, प्रा उषाजी माळी, दत्तात्रयजी अंबुलकर, प्रा सुरेश जगताप, अभय थिटे व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्री. प्रसाद ऊर्फ दिनेश नामदेव होले यांनी केले होते. कार्यक्रम संकल्पना प्रा. उषाजी माळी यांनी विशद केली.

मुळीक म्हणाले “समाजातील सर्व घटकांसाठी मोदी सरकार मागील 9 वर्षे विविध योजना द्वारे सगळ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहे.. मोदी सरकारचे धोरणच आहे की समाजातील शेवटच्या माणसापर्यंत सर्व योजना पोहचायला हव्यात अशा कार्यक्रमा मुळे या योजनांचा प्रसार होण्यास मदत होते.”
कांबळे म्हणाले ” विविध शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. कोविड काळात देखील कार्यकर्त्यांनी जीव पणाला लावून काम केले.”
होले म्हणाले ” महिलांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. अश्या चार कार्यक्रमांपैकी हा पहिला कार्यक्रम असून लवकरच पुढील कार्यक्रम आयोजित करणार आहोत. वानवडी व परिसरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी मी सदैव उपलब्ध आहे.
सूत्र संचालन अशोक वाघ आणि संतोष देशमुख यांनी तर आभार संतोष चलवादी व रवि जाधव यांनी मानले.