पुणेमहाराष्ट्र

लोणी काळभोर पोलीस स्टेशन व पुणे शहर परिसरात दहशत माजविनाऱ्या हातभट्टीवाल्यास नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षा करीता स्थानबध्द

प्रतिनिधी -स्वप्नील कदम

लोणी काळभोर मा. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सो यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये, त्याचप्रमाणे पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घर फोडी चो-या करणारे तसेच शरीर व मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचे हालचालींवर नजर ठेवून त्यांचे विरुद्ध कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणेबाबतचे आदेश सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत.

सदर आदेशास अनुसरून लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करुन त्यांचेवर कारवाई करणे बाबतच्या सुचना वजा आदेश सर्व्हेलन्स पथकाचे अधिकारी पोउपनिरी धायगुडे, अंमलदार पोहवा सातपुते, पोना धनवटे य भोसले यांना दिले होते. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हे अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सत्यवान शाखा राठोड, (वय – ३३, काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे) हा पोलीसांकडुन करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईस न जुमानता सातत्याने हातभट्टी गावठी दारू तयार करुन विक्रीचा व्यवसाय आणि सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक असलेली कृत्ये करत असल्या बाबत तसेच हातभट्टी गावठी दारु व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी सर्व सामान्य नागरीकांना धमकी देणे, शिवीगाळ करणे, वेळप्रसंगी मारहाण करुन आपली जबरदस्त दहशत निर्माण करणे अशा विघातक कृत्यांमुळे व गुंडगिरीमुळे लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे अशी महिती मिळाली. सदर माहितीचे अनुशंगाने  दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर, पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी सदर गुन्हेगारावर एम पीडीए कायदयान्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव तयार करून मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे पाठविला असता मा. पोलीस आयुक्त  रितेश कुमार पो यांनी सत्यवान शाखा राठोड यास नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षे कालावधीकरीता स्थानबध्द करणे बाबतचे आदेश पारीत केले आहेत.

सदरची कारवाई  रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर,  संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर,  रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर,  विक्रांत देशमुख, पोलीस उपआयुक्त परि. ०५, पुणे शहर,  अश्विनी राख, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक  दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक, (गुन्हे)  सुभाष काळे, पोउपनिरी अमित गोरे, पोउपनिरी किरण धायगुडे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे, पोलीस नाईक तेज भोसले यांनी केली आहे.