पुणे

“धक्कादायक घटनेने पुणे हादरलं ! नवऱ्यासमोरच सावकाराने बायकोवर केला बलात्कार; संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओही काढला, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, खासगी सावकाराचं संतापजनक कृत्य”

पुणे : (क्राईम न्युज) पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यात आता पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने त्या व्यक्तीला समोर बसवून त्याच्या बायकोवर बलात्कार केला. इतकंच नाहीतर या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरलही केला.

 

पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही घटना घडली. एका 34 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47) याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या पतीला आरोपीने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले हे पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला समोर बसवून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देत फिर्यादीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.

 

संपूर्ण घटनेचा सावकाराने व्हिडिओही काढला….

यातील आरोपीने पीडित महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना त्यांनी या घटनेचा संपूर्ण व्हिडिओही काढला. पण हा आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पुन्हा फिर्यादी महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र, फिर्यादीने नकार दिला असता आरोपीने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

 

सावकारी घटनांमध्ये हडपसर मध्ये वाढ…
हडपसर परिसरात खासगी सावकारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, कर्जबाजारी झाल्याने अनेकांनी व्याजाने पैसे घेतले असून खासगी सावकार नाहक छळत आहेत, जादा पैसे घेऊनही अनेकांना त्रास सोसावा लागत आहेत, तक्रार देण्यास लोक पुढे येत नसल्याने असल्या निर्ढावलेल्या सावकाराचे फावले आहे असा खासगी सावकारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.