दिल्ली

अखेर विंग कमांडर अभिनंदन सुखरूप; भारतात जल्लोषात स्वागत

विंग कमांडर अभिनंदन यांचे भारतात मोठ्या जल्लोषात स्वागत.
____________________________________

वीर विंग कमांडर अभिनंदन भारतात दाखल झाले आहेत. संपूर्ण देशाच्या नजरा सकाळपासून वाघा बॉर्डरवर आहेत. वायुदलाच्या प्रतिनिधीमंडळाने विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानच्या ताब्यातून भारतात आणलं. अभिनंदनचं भारतात जोरदार स्वागत करण्यात आलं. सकाळपासून लोकं अभिनंदन यांच्या स्वागतासाठी बॉर्डरवर पोहोचत होते. आज बिटींग द रिट्रीट रद्द करण्यात आली असली तर लोकांची गर्दी कमी झालेली नव्हती. भारताच्या या वीरला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अभिनंदन यांचा भारतीय वायुदलाला ताबा देण्यात आला. त्यानंतर त्यांचं मेडिकल चेकअप करण्यात आलं. अभिनंदनचं मिग 21 विमान बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या हल्ल्यात जमिनीवर पडलं. त्यानंतर अभिनंदन पाकिस्तानात जाऊन पडला. अभिनंदनने पाकिस्तानचं एक एफ-16 लढाऊ विमान पाडलं होतं.

अभिनंदनची वैद्यकीय तपासणी –

विंग कमांडर अभिनंदन यांची आज पाकिस्तानातून सुटका होणार आहे. थोड्याच वेळात वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन भारतात परतणार आहेत. इस्लामाबादहून अभिनंदन यांना वाघा बॉर्डरकडे नेण्यात येतं आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर हवाई मार्गानं त्यांना दिल्लीला नेण्यात येईल.

0 0 votes
Article Rating
143 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments