शिक्षण क्षेत्रातील सेवानिवृत्तांनी मानवतावादी समाजसेवा संघटनेच्या माध्यमातून गरजूंच्या मदतीसाठी मानवतेचा धर्म जोपासण्याचे काम सुरू केले आहे. कोरोनाच्या काळात घरंदार आणि रस्ते बंद असतानाही संघटनेचे पदाधिकारी आणि विश्वस्त गरजूंना घरोघरी जाऊन वैकुंठ स्मशान भूमीत जाऊन तेथील कर्मचारी यांना दिवाळी निमित्त मदतीचा हात देत होते. “दिव्यांग, अनाथाश्रमांमध्ये गोडधोड जेवण पंक्तीत बसवून जेवण देण्याचा नवा पायंडा सुरु केला आहे. आम्ही कोणी वेगळे नाही, तुमचेच मित्र-मैत्रिणी आहोत,” असे संदेश त्यांनी दिले, असे स्पष्ट मत डॉ. अशोक बालगुडे यांनी व्यक्त केले.
मानवतावादी समाज सेवेच्या ३१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीस दिवंगत सदस्य कै. इब्राहिम शेख, हेमंत मडावी व साईद शेख यांना अभिवादन करण्यात आले. सचिव अशोक दामोदर जाधव यांनी सन २०२४-२५चा जमा खर्च अहवाल सभासद यांचे समोर वाचन करून त्यास एकमताने मान्यता देण्यात अली. याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीनिवास नंबीयार खजिनदार बाळू बारवकर, पदमाकर बांडे, अनिल वाघमारे, दत्तात्रय कदम, सुनील पाटेकर, वासुदेव जांभेकर,सुनील गायकवाड, मेहमूदशा भंडारी, दत्तात्रय भोसले,संजय वाघमारे, सुरेश दरवडे, अभय पाटील, अरविंद पिल्ले, महात्मा फुले संस्थेच्या अध्यक्षा स्मिता वाघ, अर्चना गोजमगुंडे उपस्थित होते. यावेळी शिक्षणक्षेत्रातील कर्मवीर रतन नथु माळी यांना कै. दामोदर नारायण जाधव मानवतावादी गुणगौरव पुरस्कार सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष नवले आणि डॉ. अशोक बालगुडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच, कै. इब्राहिम शेख, श्री हेमंत सर, व सईद शेख यांनाही स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
दत्तक पालक योजनेंतर्गत आठवीतील कु. अंजली अर्चना सचिन मोरे हिला शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली.
रोहिदास एकाड यांनी सूत्रसंचालन केले. बाळू बारवकर यांनी आभार मानले
