पुण्याजवळ दिवे घाटाच्या पायथ्याशी एक शांत, सुंदर आणि इतिहासाची साक्ष देणारं ठिकाण आहे… आणि ते म्हणजे वडकी गावातील ‘मस्तानी तलाव’.
सुमारे ३०० वर्षांपूर्वी, म्हणजेच १७२० च्या आसपास, बाजीराव पेशव्यांनी हा तलाव बांधल्याचं सांगितलं जातं. सुरुवातीला याला ‘वडकी तलाव’ म्हणून ओळखलं जायचं… पण काळानुसार या ठिकाणाला एक वेगळी ओळख मिळाली आणि नाव पडले …मस्तानी तलाव.
असं मानलं जातं की बाजीराव आणि मस्तानी अनेकदा येथे येत असत… आणि मस्तानी काही काळ या तलावाच्या काठी वास्तव्यास होती. त्यामुळेच या ठिकाणाला तिचं नाव मिळालं.
या तलावाच्या काठावर आजही एक जुने शिवमंदिर आणि तटावर गणेशमंदिर दिसून येतं… जे या ठिकाणाच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतात.
इतकंच नाही, तर या तलावातून थेट शनिवारवाड्यापर्यंत जाणारा एक रहस्यमय भुयारी मार्ग असल्याची कहाणीही सांगितली जाते… जी आजही पर्यटकांना आकर्षित करते.
आज ‘मस्तानी तलाव’ हे फक्त एक पर्यटनस्थळ नाही… तर पेशवाईच्या इतिहासातील प्रेम, परंपरा आणि गूढतेचं जिवंत प्रतीक आहे.
