पुणे

मुख्यमंत्री होताच थलपती विजयचा मोठा निर्णय! 717 दारू दुकाने बंद

तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच अभिनेता थलपती विजय यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये आणि बस स्थानकांच्या 500 मीटर परिसरातील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे तब्बल 717 सरकारी तासमॅक दारू दुकाने बंद होणार आहेत.

पुढील दोन आठवड्यांत ही कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.

दारूच्या दुकानांबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादानंतर विजय सरकारच्या या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे.