हडपसरमधील पुणे-सोलापूर रोडवरील अनधिकृत पथारीवाले, हातगाडी आणि टेम्पो अतिक्रमणाचा प्रश्न आता चिघळला असून… नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Amol Nana Tupe यांनी पुणे महापालिका, वाहतूक पोलीस आणि प्रशासनाला थेट इशारा देत मोठं निवेदन सादर केलं आहे.
क्रांती शेतकरी संघटनेचा आरोप आहे की… हडपसर ओव्हरब्रिजखाली अधिकृत मार्केटची जागा असतानाही अनेक अनधिकृत विक्रेते थेट मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करत आहेत. यामुळे पुणे-सोलापूर रोडवर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
विशेष म्हणजे… रुग्णवाहिका वाहतुकीत अडकून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
क्रांती शेतकरी संघटनेने प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की… काही अनधिकृत विक्रेत्यांना स्थानिक राजकीय नेते, मनपा प्रशासन आणि पोलिसांचं अभय मिळत आहे. रोजच्या ‘हप्ता संस्कृती’मुळेच कारवाई होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की… जर तात्काळ कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
दरम्यान, संघटनेने हडपसर भाजी मंडईच्या जागेवर बहुमजली इमारत उभारून अधिकृत पथारीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची मागणीही केली आहे.
अनधिकृत अतिक्रमण हटवा, भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा आणि पुणे-सोलापूर रोड तात्काळ मोकळा करा… अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आता प्रश्न एकच…
हडपसरकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा कधी मिळणार?
