Uncategorized

मुंबईत 16 दिवसांपासून युवती बेपत्ता; कुटुंबीयांकडून न्यायाची मागणी

मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सागर अहिरे नावाचा व्यक्ती एका २७ वर्षीय युवतीला घेऊन गेल्या १६ दिवसांपासून फरार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
पीडित कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संतोष नगर परिसरातून दोघे बेपत्ता झाले असून… एमएच-०२ बीएक्स-७८४९ नंबरची टू-व्हीलर गाडी त्यांच्यासोबत असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी Aarey Police Station येथे तक्रार दाखल करूनही १६ दिवस उलटले… मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हा व्यक्ती तीन मुलांचा बाप असून सोबत घेऊन गेलेल्या आमच्या मुलीच्या जीविताला धोका आहे
सागर च्या आई,वडील, भाऊ संपर्क साधला असता ते उडवा उडवीचे उत्तर देत त्यांना माहिती आहे पण सांगत नाहीत.
पीडित कुटुंब आता एकच सवाल विचारत आहे…
या प्रकरणात त्यांना न्याय मिळणार का? सदर व्यक्ती कोणाला आढळल्यास 9146010839 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालकांकडून करण्यात आले आहे.