पुणे

लोखंडी रॉड मारून जावयानेच सासूला यमसदनी पाठविले पुण्यात घडली घटना, गुन्हा दाखल

(रोखठोक महाराष्ट्र क्राईम ऑनलाईन)
सासूसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावयाने सासूवर लोखंडी रॉडने वार करून तिचा खून केल्याची घटना औंध येथील संजय गांधी वसाहत परिसरात आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली.

दिगंबर ओव्हाळ हा मजूरीचे काम करतो. त्याचे यापुर्वी एक लग्न झालेले आहे. तर सुदामती गायकवाड यांच्या मुलीसोबत त्याने दुसरे लग्न केलेले आहे. दरम्यान त्याने सुदामती यांच्या जयश्री नावाच्या मुलीसोबत लग्न केल्यानंतर ते औंध येथील संजय गांधी वसाहतीतील लमाण तांडा परिसरातील वाघमारे वस्ती येथे राहात होता. सासू सुदामती आणि दिगंबर व त्याची पत्नी जवळच राहण्यास होते. सुदामती गायकवाड या वारकरी होत्या. त्यामुळे त्यांना दारू मांस खाल्लेलं आवडत नव्हते. परंतु दिगंबरला दारूचे व्यसन असल्याने त्याला सुदामती गायकवाड दारू पिऊन आल्यावर घरात येऊ देत नव्हत्या. या कारणावरून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. दरम्यान आज दुपारी तो घरी असताना त्याचे सासूशी काही किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यानंतर त्याने लोखंडी रॉडने सासू सुदामती गायकवाड यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

सुदामती देवराम गायकवाड (६०, रा. संजय गांधी वसाहत) असे मृत महिलेचे नाव आहे. तर दिगंबर ओव्हाळ (वय ४५ ) याला चतुंश्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

0 0 votes
Article Rating
170 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments