मुंबई

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड ; मुंबई अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा

मुंबई ;- (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली असून भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र दिले आहे . तसेच मावळते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पक्षातर्फे कुठले पद देण्यात येणार याबाबत उत्सुकता लागून आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत दादा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून नवी दिल्लीत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला होता. आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे यापूर्वीच रावसाहेब दानवेंनी काही दिवसांपूर्वीच सूचित केले होते.
याचबरोबर भाजपच्या मुंबई महानगर प्रदेशाध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या नियुक्त्या केल्या. दुसरीकडे, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये हा मोठा बदल मानला जात आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात आल्यापासून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पक्ष संघटनेत मोठं स्थान निर्माण केलं. त्यामुळे थेट दिल्लीतील राजकीय वर्तुळात देखील त्यांचं वजन बरंच वाढलं. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावर संघटनात्मक कामगिरी सोपवली गेली आहे. गेल्या काही महिन्यात चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील अनेक भागात दौरेही केले आहेत. त्यामुळे तेथील राजकीय परिस्थितीचा देखील त्यांना चांगलाच अंदाज आला आहे. याचा त्यांना आगामी निवडणुकीसाठी निश्चितच फायदा होईल.

चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत आता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे केंद्रात मंत्री असल्याने त्यांना राज्यात पूर्ण वेळ देणं आता शक्य नाही. त्यामुळेच पक्षाने चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या नावाची गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरु होती. अखेर आता त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
9 months ago

Hello! I simply wish to give you a huge thumbs
up for the great information you have got here on this
post. I will be coming back to your site for more soon.

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x