मराठवाडा

गरीब विद्यार्थ्यांसाठी मेथेकर-वडगावकर परिवाराची आस्था ; सतीश जोजारेस केली शुभविवाहातुन २७ हजाराची मदत

परभणी (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
आॕटोरिक्षा चालकाच्या मुलास आयआयटी चे शिक्षण मिळावे या साठी परभणीतील मेथेकर – वडगावकर या नवविवाहीत जोडप्यांनी आपल्या शुभ मंगलदिनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने २७ हजार रुपयांची मदत करुन अनोखा विवाह सोहळा साजरा केला.
जोजारे नावाच्या ऑटो रिक्षा चालकाचा मुलाचा वाराणसी येथे आयआयटीला नंबर लागला. त्यासाठी त्याला एक लाख ऐंशी रुपये भरण्याची आवश्यकता आहे. त्याची मदत मागण्याची भटकंती पाहून काल मेथेकर वडगावकर लग्न सोहळा रेणुका मंगल कार्यालयात संपन्न झाला. चि.योगेश प्राजक्ता कृष्णा मेथेकर व ची.सौ.राधिका अनिता रमेश वडगावकर या लग्नामध्ये डॉ. कृष्णा यांनी त्याच्या मुलाच्या लग्नात सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या लग्नात मिळालेले सर्व नगदी रक्कम त्या मुलास शिक्षणाच्या साठी मदत दिली म्हणून त्या ठिकाणी लग्नसोहळ्यात पहावयास मिळाली असा आगळावेगळा विवाह काल रेणुका मंगल कार्यालयात गुरुवार ११ जुलै रोजी पार पडला व यासाठी त्याच्या लहानपणीच्या बाल विद्या मंदिर च्या 1982 च्या बॅच ने यासाठी त्याला 22 हजारांची नगदी रोख रक्कम नवरा नवरी च्या हातात प्रेझेंट म्हणून दिली यात सुभाष एंगडे जॉइंट कमिशनर g.s.t. मुंबई व अनिता शिवाजी पहीनकर मुंबई व दीपक टाक श्री ज्वेलर्स परभणी यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये जास्तीची रक्कम त्या ठिकाणी जमा केली
अशी एकूण सत्तावीस हजाराची भरघोस मदत सतीश जोजारे याला वाराणसी येथे आयटीच्या ठिकाणी फीस भरण्यासाठी मदत झाली आणखी कोणाला जर त्याला मदत करायची असेल तर एसबीआय अकाउंट नंबर
32673411804
if code 0003667 या नंबर वर आपण ही मदत करु शकता.
कृष्णा मेथेकर Deputy Director
Food Safety and Standards Authority Of India हे वर पिता आहेत ज्यांच्या सहकार्यामुळेच हे घडले.
दरम्यान , बी व्ही एम एटी टू बॅचचे विद्यार्थ्यांनी प्रत्येकी पाचशे रुपये आहेर म्हणून डॉक्टर कृष्णा मेथेकर यांना केला त्यात भगवान खैराजानी, विवेक वट्टमवार, सुहासवट्टमवार, विनोद डावरे, दीपक पाठक, व्यंकटेश कुरुंदकर, संतोष चीक्षे,किरण आंबेकर, रवी नांदापूरकर,दीपक पाचपोर, अंबादास गांगजी, मुकुंद मोरगिरी ,सुरेश जपे ,रवी करवंदे ,श्रीकांत देशपांडे, रवींद्र धुमाळ व सुशील देशमुख यांनीही मदत केली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x