दिल्ली

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट – रस्त्यांच्या विकासासाठी व विशेष ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची मागणी – आमदार रोहित पवार

अहमदनगर – मतदारसंघातील विकासकामांना कायम प्राधान्य देत विविध महत्वकांक्षी प्रकल्पांसाठी अहोरात्र कार्यरत असणारे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी काल दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी खर्डा ते कुर्डूवाडी हा पालखी मार्ग पूर्णत्वास नेण्याच्या मागणीसह मतदारसंघातील इतर रस्त्यांच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते निधीस मान्यता देण्याची मागणी केली. तसेच अपघातातील जखमींवर वेळेत उपचार करता यावेत यासाठी मिरजगाव परिसरात विशेष ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची मागणीही यावेळी केली.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यापासून या रस्त्यांच्या कामासाठी रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यासाठी काल त्यांनी दिल्लीत गडकरी यांची दुसऱ्यांदा भेट घेऊन रस्त्यांच्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली आणि मागण्यांचे निवेदन दिले.

पैठण ते पंढरपूर या पालखी महामार्गावरील खर्डा हे ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्वाचे स्थान आहे. संत एकनाथ महाराज, संत भगवानबाबा, संत गोरा कुंभार यांच्या पालख्यांसह असंख्य वारकरी या मार्गाने पंढरपूरला जात असतात. त्यामुळे खर्डा ते कुर्डूवाडी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. तो पूर्णत्वास नेल्यास सोलापूर, नगर हे जिल्हे जोडले जातीलच, शिवाय इथल्या विकासालाही मोठा हातभार लागेल आणि वारकऱ्यांचीही गैरसोय होणार नाही.

त्याचबरोबर अहमदनगर-करमाळा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरी करण्याचे काम भारतमाला प्रकल्पांतर्गत प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून मिरजगाव, घोगरगाव, माही जळगाव या शहरी भागातील रस्त्याची अवस्थाही बिकट आहे. त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी लवकरात लवकर कंत्राटदार नेमून काम सुरु करावे अशी विनंती त्यांनी गडकरी यांना केली. या कामासाठी अडथळा असलेला भूसंपादनाचा आणि इतर प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर पाठपुरावा करून मार्गी लावले आणि याबाबत चा अंतिम प्रस्ताव आपल्या विभागाकडे देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी गडकरी यांना सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणांतर्गत शहरी भागातील बाह्यवळण मार्गाकडेही लक्ष दिले जाते. त्याप्रमाणे मतदारसंघातील बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे कामही राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणांतर्गत करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

सध्या वाहतुकीसाठी बाह्यवळण मार्गाऐवजी नागरिक इतर रस्त्यांना प्राधान्य देत आहेत, तेव्हा शहरी भागातील या रस्त्यांचेही काँक्रिटीकरन करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग ६१ जवळच्या अहमदनगर आणि करमाळा, टेम्भूर्णी, परिटी, करकंब, पंढरपूर, मंगळवेढा या भागांना जोडून कर्नाटकातील विजापूर जवळ महामार्ग ५२ ला समाप्त होणारा महामार्ग या रस्त्यांच्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण व राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून सुरु आहे. राज्यात हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून त्याचे लवकरात लवकर चौपदरीकरण होणे महत्त्वाचे आहे, याकडेही त्यांनी गडकरी यांचे लक्ष वेधले. तसेच श्रीगोंदा-जामखेड मार्गाच्या विकासाबाबतही सकारात्मक चर्चा झाली आणि येणाऱ्या अंदाजपत्रकात त्यासाठी भरीव तरतूद केली जाईल, असा विश्वास वाटतो.

अहमदनगर ते बीड राष्ट्रीय महामार्ग ५६१ हा चिंचोडे पाटील, धानोरे, कडा, आष्टी व जामखेड या शहरी भागासह अनेक दुर्गम भागांना जोडला जातो, त्यामुळे या रस्त्यासाठी बजेटमध्ये भरीव तरतूद करण्याची मागणी करतानाच या मार्गाचा विकास आराखडा संबंधित विभागाकडे असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये अहमदनगर ते धानोरा, धानोरा ते जामखेड, जामखेड ते रोहतवाडी- चुंबळी फाटा आणि रोहतवाडी ते बीड या मार्गांचा समावेश आहे. अहमदनगर, जामखेड व बीड या प्रमुख ठिकाणांना जोडणारा हा मार्ग असल्याने आगामी बजेटमध्ये या रस्त्यांसाठी अपेक्षित निधी मिळेल, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
8 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

I like the great information you provide for the article. You make blogging look easy. The overall look of your site is great, I will be bookmarking your blog.

10 months ago

Finden Sie den Stream Ihrer Wahl und genie?en Sie die Show https://cupidocam.com/content/tags/milf. Webcam-Girl-Modelle und kostenlose Shows durchsuchen

5 months ago

The integration of technology into classrooms is reshaping traditional teaching methods, offering students and educators unprecedented opportunities for collaboration, innovation, and personalized learning.

Virgin
4 months ago

I love to meet new people and have fun with them. I like to chat, free live sex cams in front of the cam and shoot clips. I am open for new adventures 🙂

Anonymous
2 months ago

free live mature sex cams that loves to be please and play!

Anonymous
2 months ago

Welcome to one of the good chatting online dating video chat of mobile evices

21 days ago

Great info and right to the point. I don’t know if this is really
the best place to ask but do you guys have any ideea where to get
some professional writers? Thanks in advance 🙂 Lista escape room

20 days ago

Real superb information can be found on weblog..

Comment here

8
0
Would love your thoughts, please comment.x
()
x