पुणे

कोव्हिडशिल्डच्या तुटवड्यामुळे ज्येष्ठांची हेळसांड केंद्र सरकारने कोविडशिल्ड लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी

 

पुणे ः प्रतिनिधी

केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरुवातीच्या काळामध्ये कोव्हिडशिल्ड लसीकरण सुरू केले. त्यामध्ये पुणे शहरात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. मात्र, सोमवारी (दि. 15) खासगी आणि सरकारी दवाखान्यामध्ये कोव्हिडशिल्ड जमा करून घेण्यात आले. दरम्यान, आज (मंगळवार, दि. 16) को-व्हॅकसिन सुरू केले आहे. परंतु, यापूर्वी ज्यांनी पहिला डोस कोव्हिडशिल्डचा घेतला आहे, त्यांना आता ते कोव्हिडशिल्ड मिळविण्यासाठी पुणे शहरातील फक्त तीन दवाखान्यामध्ये धाव घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड होणार आहे. केंद्र सरकारच्या आडमुठे भूमिकेमुळे कोव्हिडशिल्डचा दुसरा डोस घेण्यात अडथळे निर्माण झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मागिल पंधरा दिवसांपासून 60 वयोगटापुढील ज्येष्ठ नागरिकांना महापालिका आणि खासगी रुग्णालयामध्ये कोव्हिडशिल्ड लस दिली जात आहे. मात्र, अचानक को-व्हॅकिसन सुरू केल्यामुळे ज्यांनी पहिला डोस कोविडशिल्डचा घेतला, त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता दुसरा डोस कुठे आणि कसा घ्यायचा असा प्रश्न पडला आहे. प्रशासनाने तातडीने याबाबत खुलासा करावा. शहरातील फक्त तीन दवाखान्यामध्ये कोविडशिल्ड लस उपलब्ध असल्याने तेथे प्रचंड गर्दी होणार आहे. पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार आहे. त्यामुळे अपंग आणि दिव्यांगांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. प्रशासनाने तातडीने कोव्हिडशिल्डचे नियोजन करून ज्या ठिकाणी पूर्वी पहिला डोस घेतला, तेथे त्यांना उपलब्ध करून द्यावा, अशी अभ्यासकांनी मागणी केली आहे.

दरम्यान, हडपसर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे म्हणाले की, अनेक डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, वॉर्डबॉय, मावशी यांनी कोविडशिल्ड व्हॅकसिनचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, ज्या केंद्रावर कोव्हिडशिल्ड डोस घेतला आहे, त्यांना तेथेच पुन्हा दुसरा डोस उपलब्ध करून द्यावा. अन्यथा ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. यापूर्वी ज्यांनी कोविडशिल्डचा डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस उपलब्ध करून देणे ही, जबाबदारी केंद्र सरकारची आहे. शासनाने तातडीने नियोजन करून लस उपलब्ध करून दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मागिल महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, शासनाने सर्वत्र कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांनी कोव्हिडशिल्डचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील फक्त तीन दवाखान्यामध्ये कोव्हिडशिल्ड जावे लागणार आहे. तेथे कोव्हिडशिल्ड घेण्यासाठी गर्दी होणार आणि नागरिकांना त्रास झाल्यानंतर त्याची जबाबदारी कोण घेणार, रिक्षा किंवा खासगी वाहनांची गर्दी होणार, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार, अशा एक ना अनेक प्रश्नांनी ज्येष्ठांच्या मनामध्ये कालवाकालव होऊ लागली आहे. सामान्य नागरिकांना महापालिकेने तीन दवाखाने ठरविले आहेत, ते शोधणे कठीण जाणार आहे. त्यासाठीची उपाययोजना काही केली नाही, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, शहरात आजमितीला 85 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यामध्ये आणखी 9 खासगी रुग्णलांची वाढ केली आहे. या रुग्णालयांमध्ये कंद्र सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून पालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्या काही दिवसांत लसीकरण केंद्राची संख्या 94 पर्यंत होईल. पालिकेला मिळालेल्या 50 हजार कोव्हॅक्सिन पुढील तीन दिवस पुरणार आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
ससून रुग्णालयाचे अधीष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले की, सध्या ज्या केंद्रावर कोव्हिशिल्डचे लसीकरण सुरू आहे, तेच नियोजन कायम ठेवले पाहिजे. एकाच केंद्रावर दोन्ही लसी उपलब्ध करून दिल्या तर नागरिकांचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे नव्याने सुरू करण्यात आलेल्या केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या लसीकरणाचे नियोजन करता येऊ शकते, असे सूचविले आहे. ससून रुग्णालयामध्ये सध्या कोव्हिशिल्डचे 2000 डोस शिल्लक आहेत. दररोज सरासरी 300-350 जणांना लसीकरण केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x