पुणे

लोणी काळभोरमध्ये वडाची पूजा करून घरी निघालेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे ः प्रतिनिधी
वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करून घराकडे परत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याचा दोन घटना शहरात उघडकीस आल्या. धानोरी आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी लाखाचे दागिने लंपास केले.

पहिल्या घटनेत लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये एका 29 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. वडाची पूजा पार पडल्यानंतर ही महिला आहे घराच्या दिशेने जात होती. यावेळी सासवड रस्त्यावरून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुसऱ्या घटनेत 48 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या वडाच्या झाडाची पूजा करुन नातेवाईक महिलेसोबत घराच्या दिशेने जात असताना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून ओढून नेले. विश्रांतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

0 0 votes
Article Rating
621 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Farah Quill
1 year ago

¡Muchas gracias por este artículo tan informativo! Aprecio mucho las ideas y el conocimiento compartidos. Si usted o alguien aquí está interesado en seguir estudios de calidad, no dude en aplicar aquí:
Apply Here
¡Gracias de nuevo, y les deseo mucho éxito!