पुणे

पत्नी व पत्नीच्या घरच्यांना कंटाळून तरुणाने केली आत्महत्या हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

 

लोणी काळभोर | पत्नी सासु ,मेहुणा वं इतर दोन जणांच्या छळाला कंटाळून उरुळी कांचन येथील तरुण राहुल विलास खेडेकर(वय ३२रा.खेडेकर मळा उरुळी कांचन ) यांने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची तक्रार राहुलचे वडील विलास बाबुराव खेडेकर (वय ५९ रा.खेडेकर मळा उरुळी कांचन ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असुन लोणी काळभोर पोलिसांनी १) दिपाली बाळासो पाटणे (राहुलची पत्नी) २)छाया बाळासाो पाटणे, (तिची आई) ३)उदय बाळासाो पाटणे, (तिचा भाउ) ४) सोनाली विवेक पाटणे (खैरे) (तिची बहीण) ५) संतोष पाटील, (तिचे शेजारी राहणारा इसम) सर्व राहणार वानवडी ,शांती नगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राहूलचे वडील विलास खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल व दिपाली यांचा विवाह ११ ऑगस्ट २०२१ रोजी झाला होता.
लग्न ठरविण्याच्या वेळी दिपालीची आई छाया पाटणे ही खेडेकर यांच्या घरी आली होती.
परंतु मुलीचे यापूर्वीच एक लग्न झालेले होते ही बाब तिने लपवून ठेवली. विवाह झाल्यानंतर दिपाली केवळ दोन ते तीन  दिवस पतीसमवेत राहीली. त्यानंतर वेळोवेळी ती माहेरी जात असे. तिच्या माहेरी जाण्यामागे तिची आई छाया, भाऊ व इतर दोघांचा पाठींबा असल्याने ती वेळोवळी माहेरी राहत असे. राहुल याने एकदा तिचा मोबाईल हाताळला त्यावेळी त्यामध्ये तिच्या पुर्वीच्या मित्रांचे फोटो आढळून आले. त्याबाबत विचारणा केली असता तिने दम देउन “तु माझा मोबाईलला हातच का लावलास ” असे म्हणुन शिवीगाळ केली. व परत माहेरी निघुन गेली.
त्यानंतर थोडया दिवसांनी ती परत आली. त्यावेळी तिला सोनोग्राफी करावयाची होती. यावरून दोघांत वाद निर्माण झाला त्यावर त्याने आपले लग्न झालेनंतर दोघांत संबंध आला नाही. तर प्रेग्नंट राहीलीस कशी अशी विचारणा केली. त्यानंतर  माहेरी गेली ती परत सासरी आलीच नाही.
त्यामुळे राहुल याने तिला दिनांक १ डिसेंबर २०२१ रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली.परंतु सासरच्या मंडळी नी राहुलला सतत मानसिक त्रास दिला . त्यानंतर २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारांस त्याने घरी पिकावर मारण्याचे तणनाशक पिवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्याला उरुळी कांचन येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. थोडे बरे वाटलेनंतर तो घरी आला. पुन्हा त्रास होऊ लागल्याने त्यास २७ फेब्रुवारी रोजी वाय.सी.एम हॉस्पीटल पिंपरी येथे दाखल केले.
उपचारादरम्यान १५ मार्च रोजी तो मयत झाला. अंत्यसंस्कार केलेनंतर वडील कागदपत्रे चाळीत असताना त्यांना राहुलने को-या कागदावर लिहलेले तक्रार अर्ज तसेच त्याने दिपाली हीस वकीलामार्फत दिलेली नोटीसची प्रत व इतर चिठ्ठ्या मिळाल्या. या कारणांवरून त्याने विषप्राषन का केले आहे हे त्यांना खात्रीशीर समजले. म्हणून त्यांनी वरील पाचजणांच्या विरोधात तक्रार दिली आहे.