बसमध्ये चढताना पाय घसरला, मागून आलेल्या बसच्या चाकाखाली कॉलेज विद्यार्थिनीचा मृत्यू

Rokhthok Maharashtra 6 0

पुण्यातील माणिकबाग परिसरात अत्यंत दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे. बसमध्ये चढताना पाय घसरून रस्त्यावर पडलेल्या एका कॉलेज विद्यार्थिनीचा मागून आलेल्या बसच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, मृत युवती राजस्थानमधील असून ती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. खानापूर-स्वारगेट मार्गावरील बसमध्ये मोठी गर्दी असल्याने ती बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती.
मात्र, याचवेळी तिचा पाय घसरला आणि ती रस्त्यावर पडली. त्याचवेळी मागून आलेल्या स्कूलबसच्या चाकाखाली ती आल्याने गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे माणिकबाग परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.