पुण्यात गणेशोत्सवात ‘प्रेशर मिड’, ‘प्लाझ्मा’वर बंदी!

Rokhthok Maharashtra 40 0

पुण्यातील गणेशोत्सवात कर्णकर्कश आवाजाला आता ब्रेक लागणार आहे!
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘प्रेशर मिड’ आणि ‘प्लाझ्मा’सारख्या उच्च क्षमतेच्या साउंड सिस्टीमवर पूर्ण बंदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त व्हावेत, अशी मागणी विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र, आवाजाच्या नियमांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडल्यास थेट साउंड सिस्टीम जप्त केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालयात साउंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या उपकरणांची चाचणी करण्यात आली. कर्णकर्कश आणि धडकी भरवणारा आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांवर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.