खोडशी धरणाचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणार!

Rokhthok Maharashtra 6 0

कराड तालुक्यातील खोडशी धरणाचे रखडलेले काम आता मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणार असल्याची मोठी घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
कराड तालुक्यातील खोडशी गावातील धरणाचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरण आणि कालव्याची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार धरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ण केले जाईल, असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
सध्या धरणात गटाराचे पाणी आणि कचरा मिसळत असल्याने दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याची गंभीर समस्या आहे. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रश्नही मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या निर्णयाबद्दल खोडशी ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी आमदार अतुल भोसले यांचे आभार मानले आहेत. 

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.