‘अन्याय-अत्याचारावर एकच वार… शिवप्रहार!’; राज्यभर संघटनाविस्ताराचा निर्धार

Rokhthok Maharashtra 3 0

शिवप्रहारचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्काराने गौरव, १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

पुणे : “संघर्षातून न्याय, सेवेतून समाज आणि संघटनेतून परिवर्तन!” हे ध्येय घेऊन कार्यरत असलेल्या शिवप्रहार संघटनेचा १२वा वर्धापन दिन व कार्यकर्ता स्नेह मेळावा आणि धुरिणांचा सन्मान सोहळा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थापक-अध्यक्ष संजीव भोर पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यास राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आमदार तथा जेष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य व प्राचार्य एम. एम. तांबे, मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, सामाजिक कार्यकर्ते राज देशमुख, उद्योजक माणिक डावरे, डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे अमोल पाटील, आळंदीचे नगरसेवक सुरेश नाना झोंबाडे, अनिल ताडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी गोरगरीब, वंचित व पीडित घटकांसाठी कार्य करणाऱ्या तसेच सामाजिक, उद्योजकीय, आरोग्य आणि प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा शिवप्रहारच्या वतीने विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
युवा स्फूर्ती पुरस्कार — सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे
आदर्श सेवाव्रती दाम्पत्य ‘समर्पण’ पुरस्कार — डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे, संचालक, मनगाव प्रकल्प
आरोग्यरत्न पुरस्कार — मंगेश चिवटे
मानवसेवा पुरस्कार — डॉ. बच्चूसिंग टाक
युवा उद्योजक पुरस्कार — दीपक तांबे
समाजभूषण पुरस्कार — ॲड. घनश्याम रितापुरे
“समाजासाठी निस्वार्थपणे झटणाऱ्या व्यक्तींचा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याला सलाम आणि नव्या पिढीला प्रेरणा,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

राज्यभर संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा
शिवप्रहारच्या कार्यकर्ता मेळाव्यात राज्यातील विविध जिल्ह्यांतून १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये अतुल येवले — पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, वैजनाथ सुरवसे — मराठवाडा संपर्क प्रमुख, विशाल म्हस्के — अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष, शैलेश पाटील (अहिरे) — छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष, संदीप काटे — प्रदेश उपाध्यक्ष, तेजस पाटील — प्रदेश कार्याध्यक्ष युवक, आकाश सूर्यवंशी — पुणे शहराध्यक्ष शिवप्रहार वाहतूक सेना, कुमार अन्नदास — जिल्हाध्यक्ष उद्योग आघाडी सोलापूर आणि अभिजीत गायकवाड — युवक शहराध्यक्ष सोलापूर यांचा समावेश आहे.

संजीव भोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचा सामाजिक
प्रश्नावरील संघर्ष, समाजहिताचे उपक्रम अधिक व्यापक करत संघटनात्मक विस्तार करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. आगामी काळात शिवप्रहारचा “झंझावात” राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा संकल्प पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महेश टेळेपाटील, अनिल बोटे पाटील, राजू बर्डे पाटील, स्वप्नील नागटिळक, अतुल येवले, संतोष महाराज घोलप, संदीप चौधरी, भागवत कोटमाळे, विशाल म्हस्के, तेजस पाटील यांच्यासह शिवप्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.