पुण्यातील किंगमेकर संजय काकडे काँग्रेसच्या वाटेवर ; भाजपला पुण्यात झटका

Rokhthok Maharashtra 24 242

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा काँग्रेस प्रवेश अखेर निश्चित झाला आहे. स्वत: खासदार संजय काकडे यांनीच संदर्भात माहिती दिली. पुणे लोकसभा लढवण्यासाठी जे जे इच्छुक उमेदवार आहेत, ते सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार पुणे कट्टावर एकत्र आले होते. यावेळी बोलताना काकडे यांनी ही माहिती दिली.
लवकरच आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे खासदार संजय काकडे यांनी सांगितले. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर काकडे यांनी शरसंधान केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांना मी भाऊ मानले. मात्र याच भावाने मला लाथाडलं असल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी पुण्यात दिली होती. काकडे एवढ्यावर थांबले नव्हते तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली होती.

0 0 votes
Article Rating
242 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.