डॉ. शेखर साळकरांनी सांगितली नानांच्या अखेरच्या क्षणांची माहिती
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील मणिपाल रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
दरम्यान, नाना पाटेकर यांना मध्यरात्रीपासूनच अस्वस्थ वाटत होतं, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाचे डॉ. शेखर साळकर यांनी एएनआयला दिली.
डॉ. साळकर यांच्या माहितीनुसार, रात्री अडीच वाजता नाना पाटेकर यांनी त्यांच्या मित्राला मेसेज करून अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं होतं. मात्र, रात्री असल्याने त्यांच्या मित्राने तो मेसेज पाहिला नाही.
पहाटे चार वाजता मित्र त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी नाना पाटेकर घरातील फरशीवर पडलेले होते आणि त्यांच्या अंगातून प्रचंड घाम येत होता. त्यानंतर केअरटेकरला बोलावून रुग्णवाहिका मागवण्यात आली.
पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी रुग्णवाहिका त्यांच्या निवासस्थानी पोहोचली. नाना कोणताही प्रतिसाद देत नसल्याने रुग्णालयाच्या पथकाने तातडीने सीपीआर सुरू केला.पहाटे ४.३० वाजता त्यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्बल तासभर सीपीआर देऊनही त्यांना वाचवता आलं नाही आणि पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.





